
शेतकरी,आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, आदिवासी, अपंग व एकल महिला कुटुंब प्रमुख यांचे सोबत विविध उपक्रम राबवून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मागील 25 वर्षापासून प्रेरणा ग्राम विकास संस्था राळेगाव व कळंब तालुक्यात कार्य करीत आहे.
या कामाची दखल घेऊन मातृ सेवा संघ व लेले – नेने परिवार यांचे तर्फे दिल्या जाणाऱ्या संस्थापकव्दयी पुरस्कार प्रेरणा ग्राम विकास संस्थेच्या सचिव माधुरी खडसे/ डाखोरे यांना प्रदान करण्यात आला. कमलताई होस्पेट यांच्या पुण्यतिथी निमित्त व वेणूताई नेने यांच्या जयंती दिनी दर वर्षी विदर्भातील महीला कार्यकर्ती ला हा पुरस्कार दिल्या जातो,दिनांक 18 नोव्हेंबर 23 ला पंचवटी वृध्दाश्रम दिघोरी नागपूर येथील कार्यक्रमात शाल, श्रीफळ,साडी, मानपत्र व रोख रक्कम डॉ. कमल सिंग, माजी कुलगुरू, संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती, यांचे हस्ते डॉ. लता ताई देशमुख, सचिव, मातृ सेवा संघ, लीला ताई चितळे व अरूणजी लेले व निताताई टालाटुले यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.