

माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील टाकळी ईसापूर येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयत उपसरपंच पदी वंदना प्रकाश उतळे यांची निवड करण्यात आली.
अडीच वर्षे काळ ठरल्या प्रमाणे तत्कालीन सरपंच व उपसरपंच यानी या पदाचा काही महीन्या पुर्वी राजीनामा झाला होता. त्यानतंर ही निवडणुक प्रकिया घेण्यात आली. उपसरपंच या पदासाठी विठल गव्हाळे व सौ. वंदना प्रकाश उतळे हे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते
विठल गव्हाळे यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु ऐनवेळी अर्ज मागे न घेतल्याने ऊसरपंच पदासाठी चुरस वाढली होती निवडी दरम्यान विठल गव्हाळे याना च्यार मते व वंदना उतळे याना पाच मते मिळाल्याने वंदना प्रकाश उतळे यांना निवडणूक अधिकारी मधुकर सिताराम मुंडे विस्तार अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांनी वंदना प्रकाश ऊतळे यांना बहुमताने विजयी घोषीत केले यावेळी टाकळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव, संदेश मोरे , उज्वला हाके, विठल गव्हाळे ,उमेश जाधव ,सौ रोहीणी जाधव ,सौ योगीता देवकते, सौ वंदना उतळे , सौ सुषमा बाळू चव्हाण टाकळी ग्रामपंचायतचे
सचिव पि . के .कदम व ग्रामपंचायतचे कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक सुधाकर जाधव, बलदेव चव्हाण आत्माराम चव्हाण,
मोहन चव्हाण. प्रेम राठोड,
बाबूसिंग चव्हाण, नामदेव शेंडगे, राजू भारती ,खुशाल हाके ,सुभाष राठोड ,इंदल राठोड, मनोज जाधव ,रवींद्र राठोड ,बाळू चव्हाण, जयसिंग चव्हाण व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष बीट जमदार हाके व दत्ता कुसराम यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता
