धम्म क्रांती महोत्सव समीती तालुका राळेगांव तर्फे भव्य धम्म परिषदेचे आयोजन

सहसंपादक: रामभाऊ भोयर

दिनांक 17/12/2023रोज रविवार ला म.फुले सार्वजनिक वाचनालय राळेगांव येथे धम्म क्रांती महोत्सव समितीची दुपारी एक वाजता मा. चिंतामनजी ताकसांडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
मागील 2020साली होणारी धम्म परिषद कोरोणा काळामुळे स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी तिच धम्म परिषद नव्या जोमाने आणि उत्साहाने दिनांक ११फेब्रुवारी२०२४मध्ये घेण्याचे ठरविले आहे. या सभेमध्ये२०२०मधील धम्म दानाचा आराखडा आणि नवीन नियोजन याबद्दल सविस्तर माहिती धम्म क्रांती महोत्सव समितीचे अध्यक्ष मा. दिपक भाऊआटे यांनी सभेसमोर मांडला. राळेगांव तालुक्याच्या ठिकाणी एक भव्य दिव्य बुद्ध विहार असावे व त्याठिकाणी बौद्ध बांधवांच्या प्रशिक्षणाची सोय व्हावि जेणेकरुण धम्माचा प्रसार व प्रचार होईल असे मत समीती चे अध्यक्ष दिपक भाऊआटे यांनी यावेळी मांडले.
धम्म परिषदेमध्ये पहिल्या सत्रात सकाळी आदरणीय भिक्खू संघासमवेत समता सैनिक दल, उपासक व उपासिकायांची धम्म रॅली काढून पंचशील ध्वजाला मानवंदना देण्यात येईल. दुसऱ्या सत्रात धम्म प्रचारक आदरणीय राजरत्नसाहेब आंबेडकर यांचे व्याख्यान होईल तर तिसऱ्या सत्रात संध्याकाळी सुप्रसिद्ध प्रबोधनकार बुध्द भीमगित गायक अनिरुद्ध शेवाळे यांचा गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विहार तेथे संविधान हा उपक्रम हाती घेऊन पहिल्या २५गावामध्ये संविधान वाटपाचा उपक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहे.
बाहेर गाउन येणाऱ्या सर्व उपासकांची अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. ओमप्रकाश फुलमाळी सर, गोवर्धन भाऊ वाघमारे, अंकुशजिमुनेश्वर,
विकास भाऊ मुन, प्रकाशजी कळमकर, राजूभाऊ ताकसांडे, प्रमोद जी गायकवाड, सुधाकर भाऊ लोहेवे,सौ. सोनाली ताई ताकसांडे, तेलतुंबडेमॅडम, संगिता निराळे, जिवनेमॅडम, अजय दारुंडे, दिनेश धनविज,धनराजजी लाकडे, किशोर नाखले,प्रकाश शेळके, देवरावजी नाखले, संदिप लोहकरे,श्याम नगराळे कवडु कांबळे, दिलीप नगराळे , भास्कर कांबळे, प्रा. करमरकर सर, उमेश कांबळे, सुरज वाघमारे, सुनील ढोरे, दिपक दिवे, दिनेश वैरागडे,, चंदन नगराळे, भगवान भोंगाडे,मुकेश निखाडे,दसोडेभाऊ, राहुल उमरे,राजू गोटे, रमेश वनकर,रमेश लढे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.