राळेगाव पोलिसांनी केली गावठी हातभट्टी उध्वस्त

राळेगाव पोलिसांनी केली गावठी हातभट्टी उध्वस्तसहसंपादक: रामभाऊ भोयरराळेगाव पोलिसांनी केली गावठी हातभट्टी उध्वस्त

पो स्टे राळेगाव येथील जळका शिवारातील पारधी बेड्यामध्ये गावठी हात भट्टी ची दारू विक्री असल्याची माहिती मिळाल्यावरून ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी पोलिस स्टाफ ला त्वरित रवाना करून जळका येथील 1) संजय आयु राऊत वय 42 वर्ष रा.जळका 2) प्रशांत रेमा पवार वय 24 वर्ष रा जळका यांनी शेतातील झुडुपात, खदान परिसरात गावठी दारूच्या हतभट्ट्या चालविलेल्या दिसून आल्याने सदर हातभट्टी जागीच नाश केल्या,त्यामध्ये गावठी दारूच्या हातभट्टी साठी लागणारे सडवा, दारू, गुळ, तुरटी,पत्री पिपे,लोखंडी ड्रम,प्लॅस्टिक कॅन, लोखण्डी व जर्मन पातेले व दारु गाळण्यासाठी लागणारे साहित्य असा 50,250 रु आणि 54,500 रु एकूण 1,04,750 रु चा मुद्देमाल सॅंपल घेऊन जागेवर नाश करण्यात आला, दोन्ही आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
सदरची कारवाई ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मोहन पाटील, पोउपनि निलेश गायकवाड, नापोका सूरज चिव्हाणे, नापोका रुपेश जाधव, नापोका विशाल कोवे, पोका राजू शेंडे यांनी पार पाडली
.