हिंगणघाट ते नंदोरी,कोरा,गिरड,सातेफळ,का नगाव मार्ग रोडचे काम त्वरित सुरू करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

सर्व रोडचे ठेके राजकीय पुढार्‍यांचे व पी.डब्लु.डी विभागाचे दबावाखाली काम

रोडचे काम निष्कृष्ट दर्जाचे

माजी आमदार प्रा.राजु ति मांडे यांची मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली तक्रार

हिंगणघाट:- ०४ जानेवारी २०२४
हिंगणघाट – नंदोरी,कोरा ते खडसंगी रोड,गिरड ते कोरा रोड, हिंगणघाट ते सातेफळ मार्ग नागरी रोड, नांदगांव ते कानगांव या सर्व रोडचे काम त्वरीत सुरू करण्याबाबद महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,जिल्हाधिकारी वर्धा तसेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पी.डब्लु.डी ऑफिस वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत त्वरित चौकशी करून काम सुरू करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
हिंगणघाट – नंदोरी- कोरा ते खडसंगी रोडचे काम निकृष्ट दर्जाचे असुन संथ गतीने सुरू आहे. रोडची दबाई पुर्ण पणे न झाल्यामुळे रोड पसरट होत आहे. दि. २५.१२.२०२३ ला रोडची प्रत्यक्ष पाहणी केल्यास समुद्रपुर तालुक्यातील उमरी (पोकळे) ते वासी रोडचे काम संथ गतीने चालु असुन अर्ध्या रोडवर १ ते १½ इंचीचा डांबराचा थर सुरू आहे. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे करोडो रूपयाचा रोड फुटणार असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. तरी करोडो रूपयाच्या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे होणार नाही याची दखल पि.डब्लु. डी. खात्याने घेतली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.
सन २००९ च्या आधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या काळात नंदोरी ते कोरा – हिंगणघाट रोडचे काम झाल होते. त्यानंतर मागील १४ वर्षात हिंगणघाट – नंदोरी – कोरा रोडची डागडुगी झाली नाही, हे विशेष.
गिरड ते कोरा रोडचे काम अर्धवट झाले असुन निकृष्ट दर्जाची सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना रहदारी करतांना त्रास सहन करावा लागत आहे.
हिंगणघाट ते सातेफळ मार्गे नागरी रोडचे काम संथगतीने सुरू असुन निकृष्ट दर्जाचे आहे. कामाला सुरूवात करून ते काम तात्पुरते करायचे असा फंडा कंपनी व विभागाचा दिसुन येतो . पी.डब्लु.डी. विभाग दबावाखाली काम करते आहे असे दिसुन येते. हे सर्व रोडचे ठेके राजकीय पुढा-यांनी घेतले असुन पी.डब्लु.डी. विभागाचे अधिकारी दबावाखाली दबले आहे. तरी या संपुर्ण कामाची क्वालीटी कंट्रोल विभागातर्फे पाहणी व मोजमाप करून जनतेच्या पैशाचा अपहार थांबवावा.
तसेच नांदगांव ते कानगांव रोडचे काम अजुन पर्यंत सुरू झाले नसुन थातुर पातुर कामकाज सुरू आहे.
तरी करोडो रूपयाच्या कामात होत असलेला भष्ट्राचाराची सखोल चौकशी करून जनतेला दिलासा दयावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी वर्धा तसेच एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पी.डब्लु.डी ऑफिस वर्धा यांना केली आहे.