आष्टा येथे खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन

सहसंपादक :रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील शहरापासून सात किलो मिटरवर असलेल्या आष्टा येथे खुल्या गटातील पुरुषाचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे आयोजन नवयुवक क्रीडा मंडळ व आष्टा ग्रामवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे ही स्पर्धा दिनांक २९जानेवारी पासुन सुरु होणार असुन आष्टा येथिल जि. प. उच्च प्राथमिक शाळांच्या बाजूच्या प्रांगणात होणारं असून या स्पर्धेचे पहिले पारितोषीक ३१हजार रूपये रोख वै. सदाशिवरावजी तारक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आले असुन दुसरे बक्षीस २५हजार रूपये रोख डॉ कुणाल भोयर, सुनील पारीसे व रमेश कोटमकर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे तिसरे पारितोषीक २०हजार रूपये रोख निलय घिनमिने, निखील राऊत, सुगत फुळमाळी, सुनील नारनवरे व गोकुळ चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे तर चौथे बक्षीस १५ हजार रुपये रोख जि. प. उच्च प्राथमिक शाळा आष्टा व संजय भोरे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे. वैयक्तिक बेस्ट रेडर तीन हजार रुपये रोख सचिन कांबळे कडून व बेस्ट डिफेंडर साठी तीन हजार रुपये रोख महेश भोयर यांच्या कडून देण्यात येणार आह व सर्व विजयी संघास ट्रॉफी सुदर्शन शेंडे, प्रमोद घोसे, अर्जुन डहाळे, दिनेश बोरकर, विशाल तोडासे व विकास मांढरे यांच्या कडून देण्यात येणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २९जानेवारीला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार असुन सर्व संघांनी आपला सहभाग स्पर्धेत नोंदवावा असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे.