
सहसंपादक: रामभाऊ भोयर
प्रवासी हेच दैवत असे म्हणून प्रवाशांना बोलावून घेतले जात असले त्यांची बसमध्ये किती फजिती होते याचा मात्र विचार केला जात नाही हे तर सोडाच परंतु जीवितासही धोका होण्याचा संभव असतो या नादुरुस्त भंगार बसेस पाठवून प्रवाशाची बोळवण केली जात असून आज अचानक राळेगाव आगाराची बस क्रमांक एम १४ बी टी ०८९४ या क्रमांकाची बस ही राळेगाव वरुन वरध येथे जात असताना आठमुर्डी या गावाजवळ बसचे पुढील चाक निघाले मात्र कोणतीही जिवितहानी झाली नसून प्रवासी बचावले आहे.
या बसमध्ये शाळकरी विद्यार्थी तसेच प्रवासी बसले होते. राळेगाव आगारामध्ये अनेक बसेस तुटक्या फुटक्या नादुरुस्त अशा असून या बसेस नेहमी ग्रामीण भागात त साठी पाठविल्या जातात ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमुळे आहेत त्यामुळे नादुरुस्त बसेस तेव्हाच बंद पडतात तर कधी पंचर होऊन मदत थांबतात तर कधी इंजिन तापते म्हणून बस बंद पडते अशा अनेक बसेस भंगार झालेल्या असून या भंगार बसेसमुळे प्रवासी त्रस्त झाले आहे याकडे आगार प्रमुख यांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरच आहे
