विठाळा येथे संत शिरोमणी जगद्गुरु श्री सेवलाल महाराज सप्ताह ला सुरुवात

दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी श्री सेवालाल महाराज जयंती सोहळा, सप्ताह दिग्रस तालुक्यातील विठाळा येथे सुरु झाली असून या सप्ताह मध्ये विविध कार्यक्रम योजिले आहे दररोज. संत श्री सेवालाल ग्रंथा चे वाचन ह.भ. प विलास महाराज यांच्या कडून वाचन होत असून सोबत बंजारा भजननाची संगीतमय गायन असते रोज सकाळी 5:00 वाजता भव्य रॅली काढली जाते, सदर रॅली मध्ये सर्वच जाती धर्मा चे, महिला, पुरुष, सहभागी होतात, बंजारा समाजाचे महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून, रॅली मध्ये सहभागी होतात, या रॅली चे चौका, चौका त, चहा, नाश्ता देऊन गावकरी, सर्व भाविकांचे स्वागत करतात, या कालावधीत संपूर्ण गावाची साफ सफाई, होत असून, ठीक ठिकाण, रांगोळी व दिवे लावले जातात,एकंदरीत, हा सप्ताह, भक्तिमय, व आनंद मय साजरा केला जातो