नेताजी विद्यालय राळेगाव येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी

सहसंपादक: रामभाऊ भोयर

दि 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वर्ग 8 वी ची विध्यार्थीनी प्राजक्ता कीनाके तर प्रमुख पाहुणे म्हणून वर्ग 6 वी ची विद्यार्थिनी कु रिया राखडे मुख्याध्यापक श्री पी पी ओंकार हे होते. संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर अनेक विद्यार्थ्यांनी माहिती दिली तसेच शाळेतील सहायक शिक्षक श्री पी एस वासेकर व श्री व्ही आर यांनी संत सेवालाल महाराजांच्या जीवनावर माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक शिक्षिका कु एम बी नागरे यांनी केले तसेच सूत्रसंचालन विध्यार्थीनी तन्वी गौरकार व वृषाली धुर्वे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक शिक्षिका कु केवटे, कु सिडाम, कु चावट कु वानखडे तसेच शिपाई सचिन पांडे यांनी सहकार्य केले