प्रथम च्या यूथनेट प्रोग्राम अंतर्गत 60 मुलांना पोलिस सैनिक भरतीचे दोन दिवशीय प्रशिक्षण


सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील
प्रथम एज्युकेशन फौंडेशन अंतर्गत मल्टी डेव्हलपमेंट स्किल ट्रेनिंग सेंटर राळेगाव ला, राळेगाव, कळंब, समुद्रपूर ह्या तालुक्यातील 60 युवकांना पोलिस, सैनिक भरतीचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे. ह्या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असा आहे की, त्यांना भरती करणे करिता आवश्यक असणारी व्यायाम, सराव आणि सातत्य कसे ठेवायचे. मैदानी मेहनत कशी घ्यावयाचे या बाबत तरुण तरुणी अनभिज्ञ असतात. तसेच ग्रामीण भागातील तरुण युवक व युवती स्पोर्ट कडे जास्त प्रमाणात वळावी आणि खेळा मध्ये आपले करियर करावे. या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण चा पुढचा भाग म्हणजे त्यांच्या गावातील सहावी ते आठवी च्या विद्यार्थ्याना शाळेत जाऊन प्रशिक्षण आणि सराव करून देतील कारण ती मुले स्पोर्ट कडे वळावे. या प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थी तालुका, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जावून, तालुका, जिल्हा, राज्यामध्ये, गाव व तालुक्याचे नाव रोशन करतील अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. हा उपक्रम पुढील तीन वर्ष 100 गावात वेळोवेळी युवक युवती यांना प्रशिक्षण देवून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ह्या प्रशिक्षणा करिता मुख्य मार्गदर्शक म्हणून स्पोक्याडमी चे हेड यतीन श्रीवास्तव, जागतिक एथेलेटिक्स लेव्हल 2 चे कोच निलेश पाटकर, आकांक्षा गावडे लाभले आहेत. हे प्रशिक्षण यशस्वी करणे करिता प्रथम चे मेंटर्स माधुरी राऊत, ज्योत्स्ना जामणिक, राजश्री कारवटकर, मयूरी वादाफळे, प्रथम चे नॅशनल असोसिएट प्रदीप कोरडे तसेच मेंटर लीडर प्रमोद कांबळे, सेंटर प्रमुख आशीष इंगळे, सेंटर प्रमुख संदीप तंतलपाले, जयानंद टेंभेकर, किशोर काळे महेंद्र धुर्वे यांनी सहकार्य केले. .