
हिंगणघाट. प्रमोद जुमडे
महाराष्ट्र शासनाने पोलीस पाटलांच्या मानधनात भारघोस वाढ केल्याबद्दल हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेच्या वतीने शासनाचे आभार मानत आमदार समीर कुणावार यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. पोलीस पाटलांचे मानधन अल्प असून त्यांचे मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून पोलीस पाटील संघटनेची होती. याची दाखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडे सहा हजारावरून थेट पंधरा हजारापर्यंत मानधन वाढविले आहे. मानधनात साडेआठ हजाराची भरघोस वाढ पोलीस पाटलांना मिळाली आहे. अनपेक्षितरीत्या मानधनात मोठी वाढ मिळाल्याने पोलीस पाटील संघटनेने शासन स्वरूपात आमदार समीर कुणावार यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी बोलताना आमदार कुणावार म्हणाले की पोलीस पाटलांच्या पाठीशी युती शासन सदैव असून त्यांना वेळोवेळी येणाऱ्या समस्या सोडविण्यास तत्पर असल्याचे सांगितले. तसेच समुद्रपूर व हिंगणघाट येथे येत्या काळात पोलीस पाटील भवनाची निर्मिती करण्याचे आश्वासन याप्रसंगी आमदार कुणावार यांनी दिले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे भाजपा जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य, तसेच पोलीस पाटील संघटनेचे भालचंद्र सचिव सचिन ठवरे, स्वेता नरेंद्र लोंडे ,वृषाली खुशाल चेले , वर्षा धनराज घाटुले- कोपरा,मनिषा अमोल पुसदेकर , पुष्पा रविंद्र विरुरकर , संदीप चंदनखेडे ,गणेश तडस , पंकज चौधरी, भोपाल राजेंद्र कीरपाल , अल्का संजय नहाते ,
आमोल रंगारी , तुकाराम टेभरे ,पंढरी पीपरे , सुरेखा गायकवाड , वंदना धोटे , अपर्णा गोटमारे, वंदना लोणारे ,नीता पर्बत ,मिलिंद वादाफळे,सुरज पाटील, बाबा तडस ,
प्रफुल भोयर ,
राकेश कवडे आदी उपस्थित होते.
