जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल – न प मुख्याधिकारी यांना दिल्या सुचना
राळेगांव शहरातुन गेलेला महामार्ग क्र ३६१ बि हा रस्ता होवून पाच ते सहा वर्ष झाली रस्ता पूर्ण झाला त्यावेळेस औद्योगिक प्रशिक्षण संस्था राळेगांव पासून ते वर्धा रस्ता बाय पास पर्यंत पथदिवे लावले होते सुरवातीच्या काळात दिलीप बिडकॉम हि कत्राट घेणारी कंपनी काम पहात होती परंतु मागील तिन वर्षापासून पथदिवे बंद आहे . दिलीप बिडकॉन ने आपला गाशा गुंडाळून पुढील कंत्राट घेऊन ते कुठे गेले हे पता नाही शहरातील जागृत नागरीकांनी वारवार तहसीलदार उपविभागीय अधिकारी आजी – माजी आमदार खासदार यांना वारंवार भेट घेऊन निवेदन देऊन पथदिवे बंद असल्याचा प्रश्न मांडला आहे . परंतु हा प्रश्न निकाली निघाला नाही यानंतर राळेगांव न .प . चे मुख्याधिकारी यांना भेटले असता आपल्या कडे पथदिव्याचे मेन्टनस करण्याचा अधिकार नाही असे उत्तर मिळाले . या नंतर विजवितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन मुख्य अभियंत्यास भेटले असतांना त्यांनी पथदिव्याचे बिल कंपनी ने पाच लाख रुपये भरणा न केल्याने विज प्रवाह खंडीत केला आहे हे सांगितले आहे . शेवटी सर्वांच्या उत्तराने समाधानी न झालेल्या या तरुण प्रतिनिधोनी शेवटी यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांची भेट घेऊन शहरातील मुख्यमार्गावरील पथदिव्याचा प्रश्न सांगितला गेल्या तिन वर्षापासून राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद आहे व यामुळे आतापर्यंन पाचते सहा नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहे व छोटे मोठे अनेक अपघात झाल्याचे ही सांगितल्याने जिल्हाधीकारी यांनी हा प्रश्न झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगीतले व लगेच राळेगांव नगरपंचायत चे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांना तातडीने पथदिव्याचा प्रश्न सोडविण्याच्या सुचना दिल्या नगरपंचायत राळेगांव यांनी थकीत असलेले विजबिल भरून पथदिव्याची देखभाल करण्याचे त्यांनी सांगितले जिल्हाधीकारी यांना भेटून निवेदन देते वेळेस मंगेश अशोकराव राऊत नगरसेवक, दिलीप कन्नाके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष ( शरदपवार गट ), संजय दुरबुडे तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष , नितीन कोमेरवार उपस्थित होते .
