मातोश्री स्वर्गीय आशाताई कुणावार अभ्यासिकेचा विद्यार्थी श्रेयस दहापुते चे एमपीएससी परीक्षेत सुयश , मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून मिळाली नियुक्ती , आमदार समीर कुणावार यांनी केला सत्कार


प्रमोद जुमडे:हिंगणघाट

              

हिंगणघाट येथील मातोश्री स्वर्गीय आशाताई कुणावार अभ्यासिकेचा विद्यार्थी श्रेयस अरविंद दहापूते याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. त्याला मंत्रालयात कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती मिळाली आहे. याबद्दल आमदार समीर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात श्रेयसचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्रेयस हा येथील संजय गांधी विद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने मेकॅनिकल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे . २०२३ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याला मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. श्रेयसचे वडील अरविंद दहापुते हे संजय गांधी शाळेत शिक्षक असून त्याची बहीण आर्किटेक आहे. मातोश्री स्वर्गीय आशाताई कुणावार अभ्यासिकेमुळे मला मोलाची मदत झाली. या ठिकाणी परीक्षे करीता आवश्यक सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध असल्याने यश संपादन करता आले. असे सांगून श्रेयसने आमदार समीर कुणावार यांचे आभार मानले. यावेळी भाजपा वर्धा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे,भाजपा जिल्हा सचिव प्रा किरण वैद्य, अभ्यासिकेचे संरक्षक विजय राठी आदी उपस्थित होते.