विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी श्रावनसिंग वडते सर यांची फेरनिवड

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना ही स्वातंत्र्य पूर्व म्हणजे 1946 मधील शिक्षकांची संघटना असून ही संघटना कुठल्याही पक्षाला बांधिल नसून या संघटनेने अनेक शिक्षक आमदार दिले असून त्या आमदारांच्या माध्यमातून शिक्षकांना अनेक मागण्या मान्य करून एक स्वतंत्र जीवन जगण्यासाठी हक्क मिळवून दिले.या संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना बॅंकेतून पगार मिळण्यासाठी प्रयत्न करून मागणी मंजूर करून घेतली.अशा या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेमध्ये मी गेल्या 25, वर्षांपासून आजीवन सभासद ते राळेगाव तालुका कार्यवाह,परत मागील कार्यकारणीत यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पद सांभाळले असून संघटनेने माझ्या कार्याची दखल घेत परत मला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड केली असून या निवडीचे श्रेय शिक्षक महामंडळ मुबंईचे अध्यक्ष तथा माजी आमदार विश्वनाथजी डायगव्हाणे सर, विद्यमान शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले सर, प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख सर, माजी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अशफाक खान सर ,जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर नवनिर्वाचित कार्याध्यक्ष आनंद मेश्राम सर यांच्या सह अनेक मान्यवर मंडळींना जात असून मी अशाप्रकारे संघटनेचे कार्य प्रामाणिकपणे इमानेइतबारे करत राहणार असल्याचे श्रावनसिंग वडते सरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.