नापिकी , कर्जबाजारी पणाला कंटाळून नारळी (तांडा) येथील शेतकऱ्यांची विष पिऊन आत्महत्या

ऊमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामू नाईक तांडा नारळी येथील तरुण शेतकरी चंदन दामू राठोड व अंदाजे (32) यांनी स्वतःच्या शेतामध्ये जाऊन कीटकनाशक औषध घेऊन
कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या (suicide) केल्याची घटना 29 फेब्रुवारी रोजी सायकाळच्या दरम्यान घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरून मर्ग करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नारळी येथील तरुण शेतकरी चंदन दामू राठोड(वय 32) यांनी दिनांक 29 फेब्रुवारी रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळच्या दरम्यान घडली. त्यांच्याकडे दोन एकर शेत जमीन आहे. तसेच स्टेट बँकेचे पीककर्ज सुद्धा आहे. गतवर्षी रोजगार हमी योजनेतून विहीर सुद्धा मंजूर झाले होते त्या विहिरींचे बांधकामासाठी काढलेल . त्याचेही खाजगी कर्ज त्यांच्या डोक्यावर होते.

यावर्षी सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. तुरीचे पीकही अवकाळी पावसाने गेले आहे. सोयाबीनच्या मालाल भाव नसल्याने शेतकरी वर्ग पुरता मेटाकोटीस आलेला आहे. आसमानी व सुलतानी संकटांनी शेतकरी वर्ग कर्जबाजारी होत आहे. त्या निराशेतून शेतकरी आत्महत्या करत आहेत. सदर शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यांच्या मागे आई-वडील एक मुलगा एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे
दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रेम केदार यांच्या मार्गदर्शनामध्ये निंगनूर बिट जमदार गजानन खरात हिमत जाधव करीत आहेत.