
बिटरगांव (बु) प्रतिनिधी// शेख रमजान
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली या संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा दिनांक 5 एप्रिल 2024 शुक्रवार रोजी लक्ष्मी कम्प्युटर वसंतनगर येथे 12:00 वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमाला भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुंबई माननीय श्री राहुलजी गंगावणे साहेब उपस्थित राहणार आहेत व त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय मेळावा 2024 घेण्यात येणार आहे आपल्या भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त भारत ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रामध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमातून खूप मोठा ऐतिहासिक संकल्प आम्ही महाराष्ट्र मध्ये घडवीत आहो. सर्व नवीन सदस्यांना माननीय राहुलजी गंगावणे साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सदस्यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटन दिल्ली यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विजय कदम व भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटन दिल्ली यवतमाळ जिल्हा शहर प्रमुख दिलीपराव मुनेश्वर यांनी केले आहे
