राजकारणी लोकांनी विकास कामे करत असताना सामाजिक सेवेच्या कार्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही – मधुसूदन कोवे गुरुजी.

                    राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 

लोकदुत वर्धापन दिनानिमित्त माऊली वृद्धाश्रम धोत्रा येथे ” निराधारांना आधार ” म्हणून स्वादिष्ट भोजन आणि शेला दुपट्टा असा कार्यक्रम आयोजित केला होता या सामाजिक कार्यक्रमा निमित्त अध्यक्ष म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांना आमंत्रित केले होते तसेच सामाजिक कार्यकर्ते मा अशोकराव उमरतकर मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ आणि श्रीमती आशाताई काळे संचालिका ग्राम स्वराज्य महामंच हे उपस्थित होते* या कार्यक्रमाचे आयोजन लोकदुत वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी शेख रुस्तुम यांनी केले माऊली वृद्धाश्रम चे संस्थापक अध्यक्ष मा सुरेंद्र जी रुद्राक्षवार यांच्या मुलाखती मधुन अनेक समस्या वृध्दाश्रम मध्ये दिसुन आल्या त्यांनी सांगितले की देणगी देणारी मानसं समाजात पुष्कळ आहे परंतु सेवा देणारी मानसं बोटावर मोजण्या इतकी आहे.शासनाचे अनुदान नाही राजकारणी लोक फक्त विकासाच्या गोलगप्पा करतात परंतु वृध्द मानसं कशा अवस्थेत जगतात ह्या कडे प्रामुख्याने दुर्लक्ष करताना दिसतात ही गंभीर बाब आहे असे आम्हाला निदर्शनास आले.. सर्व वृद्धा ची आरोग्यासाठी दक्षता लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे संपूर्ण वृध्दाश्रमात सरकारने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि राजकारणी लोकांनी फक्त विकासाच्या गोलगप्पा करु नये तर सामाजिक सेवा करणारी माणसं पुष्कळ आहे यांना आधार देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी राजकारणी लोकांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असा इशारा मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी आपल्या विचारातून दिला आहे. ग्राम स्वराज्य महामंच च्या वतीने वृध्दाश्रमातील सर्व वृद्धांना शेला दुपट्टा दिला काही वृद्ध पुरुषांना बनियन दिल्या आणि लोकदुत वृत्तपत्राचा वर्धापन दिवस माऊली वृद्धाश्रम धोत्रा येथे त्यांच्या सहवासात घालवला या निमित्ताने गावचे सरपंच येसनसुरे आणि सुरेंद्र जी रुद्राक्षवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले