राळेगाव येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण जाधव यांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; १लाख६४ हजार रुपये किमतीचा मुद्द्माल हस्तगत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातुन अवैध दारूची चोरटी वाहतूक होत असते. त्या विषयी नव्याने रूजू झालेले कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली त्यामुळे गुरुवारी रात्री कळंब येथुन मोटर सायकल वरून दोन जन अवैध दारु नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली व त्वरीत रामतीर्थ रोडवर सापळा रचून मोटर सायकल वरून अवैध दारु वाहतूक करणाऱ्या दोघांवर कार्यवाही करण्यात आली त्यामध्ये त्यांच्याकडे २७ हजाराची देशी तर सात हजार दोनशे रुपयाची विदेशी दारु मिळून आली व केटीम कंपनीची बिना नंबरची मोटर सायकल असा १लाख ६४ हजार रुपयांचा मुद्दमल जप्त करण्यात आला यात आरोपी म्हणून गोपाल बोभाटे व ललित नाईक रा. कळंब यांच्यावर दारुबंदी कायदानुसार विविध कलम लावून गून्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही राळेगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मोहन पाटील, पोलीस उप निरीक्षक निलेश गायकवाड व कर्मचारी यांनी केली आहे.