
सहसंपादक : रामभाऊ भोयर
समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभरात अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा एकविरा देवी संस्थान हिवरा ता महागाव जिल्हा यवतमाळ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय कमी कालावधीत पूर्ण महाराष्ट्र भरात जिल्हा, तालुका व सर्कलनुसार युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन करून जिथे छोट्या – मोठ्या, ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळा दर्जा मिळत असल्याने पञकारांची संघटना करून पूर्ण महाराष्ट्र भरात कुठल्याही लहान मोठ्यांचा भेदभाव न करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी जो विडा उचललेला आहे. त्यास आज खरोखरच महाराष्ट्रात यश मिळाले आणी याचे खरे कारण म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला सर्वतोपारी मदत होत असल्याने या संघटनेमध्ये राज्यभरातून पत्रकार जुळलेले आहेत आणी एवढेच नव्हे तर भविष्यात पूर्ण भारतभर युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करू असेही त्यांनी
राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी आपले मत व्यक्त केले. सदर राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विविध क्षेञातिल मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन उमरखेड महागांव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र नजरधने प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत साईनाथ महाराज , शाम महाराज भारती, पंचायत समितीचे माजी सभापती गजानन कांबळे, युवा ग्रामिण पञकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व प्रमुख पाहुन्याच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सचिन वैद्य व भाऊराव कोटकर वर्धा यांना शिल्ड , हार , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. म्हणून उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सचिन वैद्य व भाऊराव कोटकर यांचा सत्कार करीत सन्मानित केल्याबद्दल युवा ग्रामीण पत्रकार संघ वर्धाचे जिल्हा उपाध्यक्ष आर्यन कांबळे , तुषार रेड्डीवार , अमोल ठाकरे , रवींद्र पारिसे , शंकर परचाके , प्रज्वल भेदुरकर , सचिन महाजन , कृष्णा काकडे , विनोद नक्षिने , दुर्वेश डफ , रियाज पटेल , अब्दुल कादीर , विठ्ठल पिंजरकर , आदित्य सिडाम , पंकज तडस , अतुल काकडे , आशिष जाचक , शेख फरिदिन , रवींद्र तुबडे , दिलीप ठाकरे , ताराचंद ढगे , जयंत दूरबुडे , महिला सुवर्णा पाटील , रेणुका दूरबुडे , हर्षाली सातघरे , योगिता काकडे इत्यादी वर्धा जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सर्वांनी आनंद व्यक्त करीत शुभेच्छांचा वर्षाव केला.
