श्रीराम जन्मोत्सव श्रीराम नगर कार्यकारी सोसायटी चे वतीने उत्साहात साजरा…

प्रभू मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची जयंती श्रीराम नगर येथे, साजरी करण्यात आली.प्रसंगी भजनाच्या गर्जनात भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामाचे पूजन करण्यात आले, श्रीराम नगर येथील लहान मुलांनी श्रीरामाची वेशभुषा साकारली होती ,त्याच बरोबर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.रामायनावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली होती त्यात सर्व मुलांनी सहभाग घेतला , बंधुभाव एकात्मता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाच्या आयोजन श्रीरामनगर कार्यकारी सोसायटी वणी चे माध्यमाने करण्यात येते, सोसायटी चे सर्व पदाधिकारी, त्यात अध्यक्ष म्हणून शरद तराळे, उपाधक्ष सौ,सुरपाम काकु ,वैभव राऊत, सचिव रविंद्र चांदणे, सहसचिव आत्माराम ताजने
कोष्ध्यक्ष धंनजय गाडगे,
संचालक, भूपेंद्र देरकर, भास्करराव मोरे, प्रकाश डाहुले, दुर्गेश्र्वर उर्कुडे, वसंत डाखरे, अदवेश प्रसाद, संजय पांचोले, प्रवीण झाडे, अनिल खरवडे, ऍड, दीपक खोके, प्रमोद जूनुनकर,
श्री पाटील सर, पंढरी वनकर ,
श्री झुंगरे, बळीराम बोबडे, कैलास मेश्राम,
लक्ष्मण सूरपाम आदी सर्व महिला तसेच श्रीराम नगर येथील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते, स्पर्धक मुलांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला . नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचा आस्वाद घेतला, कार्यक्रम यशस्वितेकरीता सर्व नियोजीत समिती तील सदस्य यांनी उत्कृष्ठ सहभाग दिला, कार्यक्रम
यशस्वितेकरीता श्रीराम नगर येथील महिलांनी अथक परिश्रम घेतले,