दहेगाव येथे पाण्याच्या टाकीच्या मुरुमाची अवैध मुरुम तस्कराकडून रात्रीच्या वेळी चोरी,संबंधित ठेकेदारांचे कामाकडे दुर्लक्ष

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या दहेगाव येथे जिल्हा परिषद शाळेचा खुल्या जागेवर जल जिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम करिता खोदकाम करण्यात आले आहे तर सदर खोदकाम मध्ये एक ते दीड लाख रुपया पर्यंत मोठ्या प्रमाणात मुरुम निघाला आहे परंतु गावातील अवैध मुरुम तस्करांनी गावात मोठ्या प्रमाणात घरांचे बांधकाम सुरू आहे त्या करिता त्यांनी घरांचे जोते भरण्यासाठी रात्रीच्या वेळी गावातील लाईट बंद करून लोक झोपी गेल्याचा फायदा घेऊन मुरुमाची खुलेआम चोरी करत आहे यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे व सरकारी मुरुमाची चोरी करत आहे अवैध मुरुम तस्करांना अभय कोणाचं आहे दहेगाव ग्रामपंचायत कि संबंधित ठेकेदार किंवा महसूल कर्मचारी व प्रशासनाचे आहे कोणाच्या अभय शिवाय मुरुम चोरी करण्याची हिंमत करु शकत नाही नाही तर आर्थिक व्यवहार झाला असेल असे दहेगाव गावातील नागरिकांत बोले जात आहे ज्या शाळेच्या जागेवर पाण्याच्या टाकीचे बांधकाम होणार आहे त्या शाळेत प्रांगणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते विध्यार्थीना मानसिक त्रास सहन करा लागते तर त्याठिकाणी मुरुम भरण्याची आवश्यकता आहे व संबंधित टाकीच्या खड्डा भरण्यासाठी मरुमाची गरज असताना रात्रीच्या वेळी दादागिरी करून अवैध मुरुम तस्करांनी एक दिवस बाद मुरूम चोरी करण्याची सपाटा चालु आहे वरिष्ठांनाने या विषयात तात्काळ लक्ष द्यावे नाहीतर हे अवैध मुरुम तस्करी एक ही मुरुमाचा खंडा ठेवणार नाही याची तात्काळ लगाम आवरा अशी दहेगाव वासी यांची मागणी आहे