श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्य आयोजित गुरुचरित्र पारायण प्रहर सेवा व अखंड नाम जपा तपाच्या सप्ताहाची ढाणकी शहरात सांगता


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


भक्त वत्सल म्हणून श्री स्वामी समर्थ यांची ख्याती भक्त गणात असून ते दत्तप्रभूत अवतार असल्याकारणाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भक्तवर्ग आहे ढाणकी शहरात सुद्धा श्री स्वामीरायांचे भक्त मोठ्या प्रमाणात असताना एकही स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्र नव्हते. त्यामुळे समर्थांची शिकवण व कार्य सर्वसामान्या पर्यंत पोहोचविने शक्य नसे. असे असताना काही भक्त श्रेष्ठांनी आध्यात्मिक व बाल संस्काराच्या बीजांकुरांचे रोपटे लावू अशी संकल्पना मांडली या सुयोग्य, यथोचित संकल्पनेला भक्तांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आज रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राची स्थापना होऊन समर्थांचे उपदेश व सद्गुरूची शिकवण याची जाणीव होत असताना भक्तमंडळीत माता, पिता, बहिण, बंधु, चूलता, असे सर्व नाते समर्थात बघतात.
ढाणकी शहरात सुद्धा श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने श्री गुरुचरित्र पारायण प्रहर सेवा व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह मंगळवार दिनांक ३०/४/२०२४ ते सोमवार ६/५/२०२४ असे एकूण ७ दिवसाच्या सप्ताहाचे आयोजन केले होते. या चालणाऱ्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण व इतर जपा तपासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांनी सहभाग नोंदविला त्यात एकूण ३० महिला व ५ पुरुष असे एकूण ३५ भक्तश्रेष्ठांचा सहभाग होता विशेष प्रहर सेवा ही ७ दिवसाची होती. या सर्व बाबीची भक्तांना जाण व लाभ व्हावा याकरिता केंद्रप्रमुख पूनम चव्हाण, शितल वर्मा, गजानन रावते, प्रशांत पंडितकर, प्रफुल चौरे, यांनी अचूक व योग्य नियोजनबद्ध रूपरेषा आखली होती. समर्थांच्या नामस्मरणामध्ये खंड पडू नये यासाठी २ घटी केला एकूण४ भक्ताची नेमणूक करण्यात आली होतीया वेळी स्वामी समर्थ मंत्र जप, महामृत्युंजय मंत्र, गुरु गीता, श्रीमद्भ भागवत गीता, नवनाथ भक्तिसार, नाणार्णव नवमंत्र, रुद्र,इत्यादी भक्तीयुक्त बाबीचा सहभाग होता मोठ्या प्रमाणात वातावरण भक्तिमय झाले होते व पारायण करणाऱ्या मंडळींना आकाश मंडप तर पृथ्वी आसन असा भास पारायण करनाऱ्या भक्तांना होत होता. मोठ्या प्रमाणात उन्हाची दाहकता असताना आतील वातावरण थंड राहून भक्तांना पारायन करताना त्रास होऊ नये यासाठी आयोजकांनी योग्य असे अचूक नियोजन केले होते. भव्य दिव्य शामियांना टाकला होता गुरुचरित्र पारायण यास मोठ्या प्रमाणात पावित्र्य जपावे लागते त्या सर्व बाबीचे अचूक नियोजन या ठिकाणी होते. दि.६मे रोजी सोमवारला पायराणाची सांगता झाली. १०:३०वाजता महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजकांनी भक्तांना अन्न हे पूर्णब्रह्म आहे ही स्वामी गुरूरायांची समर्थांची शिकवण वेळोवेळी समजावून सांगून अन्न लागते तेवढेच घ्या टाकून देऊ नका ते परब्रह्म आहे असे संदेश देत होते. एवढे सगळे असताना आयोजकांना जागेच्या अभावाची उणीव भासत होती त्यामुळे आता त्या ठिकाणी दिवसागणिक भक्तगण वाढणारच या उद्देशाने हळूहळू समर्थांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार वाढतच आहे त्यामुळे तेथील प्रांगण अजून मोठे झाल्यास उत्तम होईल व भक्तांची अडचण सुटावी अशी चर्चा भक्त मंडळीत होती.रंजना संतोष चिंचोलकर, प्रगती चिंचोलकर, जयश्री कोडगिरवार, अयोध्या महाजन, साधना मिटकरे, माधुरी हुडगे, योगिता चिन्नावार, शितल फाळके, वनमाला राठोड, इत्यादी माता भगिनींचे सहकार्य लाभले तर विक्रम वर्मा, विकी ठाकूर, पप्पू येरावार, अमोल नरवाडे, विशाल धोपटे, अभिजीत कदम, नरेश मुक्कावार, विष्णू भूमीनवाड, गणलेश गांजरे, मनोज राहुलवाड, यश कुबडे व स्वामी समर्थांच्या विचारांना मानणाऱ्या भक्तमंडळींनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
चौकट:: भक्तांचा ओसंडला होता जनसागर समर्थांच्या पुण्यतिथी निमित्याने पण जागेचा अभाव प्रकर्षाने होता जाणवत दानशूर दात्यानी पुढे येण्याची गरज