
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिवसेंदिवस सर्वत्र हृदय विकाराच्या बिमारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हृदय विकाराचा कधी कुणाला झटका येईल याचा नेम राहिला नसून आज दिं ७ मे २०२४ रोज मंगळवारला तालुक्यातील डुक्करपोड येथील गुलाब माधव आत्राम व त्याची पत्नी छामीबाई गुलाब आत्राम हे दोघेही सकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले असता गुलाब आत्राम वय ६२ वर्ष झाडावर तेदुपत्ता तोडत असतांना अचानक छाती दुखायला लागली असता तो झाडावरून खाली उतरला व तो पत्नीला सांगत असतांना पत्नीने पिण्यासाठी दिले मात्र वेळात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे आपल्या चमू सह तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आले.
सदर मृतकाची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तो आपल्या कुटुंबाची उपजीविका केलेल्या रोजमजुरीतून भागावयचा नेहमी प्रमाणे आज तो आणि त्याची पत्नी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला असता अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने तो झाडावरून खाली उतरला मात्र काही वेळातच जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे . सदर घटनेचा तपास बिट जमादार रमेश मेश्राम हे करित आहे.
