

महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील मन्याळी येथे दिनांक 12 मे रोजी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होते
ग्रामीण भागात जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. मात्र त्याचा गांभीर्याने कोणीही उपयोग करून घेत नाही.
आजच्या युगात लग्न सोहळा म्हटलं की लाख रुपयाचा खर्च येतो. शिवाय एखाद्या रामनवमी उत्सव किंवा भागवत कथेचा उत्सव असो की सर्वधर्मीय विवाह मेळाव्या सारख्या कार्यक्रमातून विवाह सोहळा संपन्न होत असेल तर ती काळाची गरज असून लग्नात होणारा लाख रुपये खर्च आपल्याला बचत निश्चितच करता येईल व एरवी येणारा लाख रुपया खर्च वाचवता येईल त्यासाठी अशा सामूहिक विवाह सोहळ्याची नितांत गरज आहे असे मौलीक प्रतिपादन समाजसेविका पूजा अंबादास धुळे यांनी मांडले ते मन्याळी येथील सर्व धर्मीय विवाह मेळावा मध्ये येथील भव्य दिव्य विवाह सोहळ्याच्या मंडपात आयोजित करण्यात आलेल्यासर्वधर्मीय विवाह सोहळा समारोप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या विवाह सोहळ्याला परिसरातील हजाराच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती
