वन्य प्राण्यांचा हैदोस, शेतमालांचे अतोनात नुकसान,वनविभागाकडून झटका बॅटरी व कुंपणतार अनुदानातत्त्वावर देण्याची शेतकऱ्यांची मागणी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुका हा मारेगाव वनपरीक्षेत्र कार्यलय अंतर्गत येत असून तालुक्यातील खैरी, वडकी, चाहांद, वाढोना,येवती, धानोरा या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात रोही, डुक्कर, वानर व सारज यासारखे वन्य प्राणी कापूस तुर हरभरा गहू या पिकाचे अतोनात नुकसान करीत आहे मात्र वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या, परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे व वनविभागाकडून त्यास कुठलीही मदत मिळत नाही हे वास्तव चित्र आहे.
राळेगाव तालुका हा घनदाट जंगला,ने वेढला असून हे वनपरिक्षेत्र मारेगाव वनपरिक्षेत्रात येते मात्र तालुक्यातील डोंगरालगतचे दहेगाव, देवधरी ,विहीरगाव, लोणी, बंदर, वरध, सावरखेडा असे काही ठराविक गावे वगळली तर खैरी, वडकी, येवती, वाढोना ,धानोरा अशा बऱ्याच गावांना वनविभागाकडून वन्य प्राण्याकडून शेती पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना तारकुंपण ,झटका बॅटरी अशा योजना दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच गावातील शेती पिकांचे वन्य प्राण्याकडून मोठे नुकसान होत आहे. मात्र या काही गावांना वनविभागाकडून कोणतीही मदत मिळत नाही हे वास्तव चित्र आहे.शेतकऱ्यांनी तार कुंपणाची वेळोवेळी मागणी केली मात्र या मागणी कडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे .या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी वैतागले आहे. राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे रोही, डुक्कर, वानर या वन्य प्राण्यांनी शेतातील पराठी कापूस तुर व आता रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.

आधीच अस्मानी सुलतानी संकटांनी शेतकरी परिपूर्ण मेटकुटीस आला असून आता रब्बी हंगाम लागला असून या वन्य प्राण्यांनी कापूस, तुर हे पीक जमीन दोस्त केले असून रब्बी हंगामातील आता नुकतीच लागवड केलेले हरभरा, गहू ह्या पिकांची सुद्धा हे वन्यप्राणी खूप नासाडी करीत आहे. तेव्हा या वन्य प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताला तारकुंपण व झटका बॅटऱ्या वनविभागाकडून अनुदान तत्त्वावर मिळाव्यात अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे. राळेगाव तालुक्यातील काही भागांना या योजनेचा फायदा मिळतो मात्र बऱ्याच ठिकाणी या योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र जिकडे तार कुंपण झाले व झटका बॅटरी योजना मिळाली त्या भागातीलच वन्यप्राणी जो भाग योजनेपासून वंचित आहे इकडे भरकटले असून ज्या भागाला योजनेचा लाभ मिळाला नाही त्या भागात हे वन्यप्राणी राजरोसपणे फिरून पिकांचे खूप नुकसान करीत आहे.

तेव्हा वनविभागाकडून तारेचे कुंपण व झटका बॅटऱ्या वनविभागाच्या अनुदान योजना तत्त्वावर राळेगाव तालुक्यातील सर्व गावांच्या शेतकऱ्यांना मिळाव्यात जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करता यावे. तसेच वन्य प्राण्यांनी शेतमालाच्या केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तालुक्यातील बऱ्याच भागात वनविभागाकडून राबविल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई ची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना नसल्यामुळे वनविभागाने खेडोपाडी कॅम्प लावून वनविभागाच्या योजनेची शेतकऱ्या पर्यंत माहिती पोहोचवावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.

        

खैरी परिसरासह तालुक्यात वन्य प्राण्यांनी खूपच हैदोस घातला असून पऱ्हाटि (कापूस), तुर पिक रोही व डुक्कर यांनी जमीनदोस्त केले असून काही उभ्या राहिलेल्या कापसाची बोंडे माकड हे तोडून खात असल्यामुळे तसेच तुरीच्या शेंगाची ही नुकसान करीत आहे. तसेच आता रब्बी पिकातील हरभरा गहू ह्या पिकांचे सुद्धा वन्य प्राण्याकडून खूप नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी हा अस्मानी सुलतानी संकटाने परिपूर्ण मेटकुटीस आला असून बरबाद झालेल्या शेतकऱ्याला या वन्य प्राण्यांच्या होणाऱ्या नुकसानी पासून वाचवण्यासाठी वनविभागाने तारकुंपण व झटका बॅटरी या योजना खैरी परिसरातील व इतर परिसरातील शेतकऱ्यांना अनुदानातत्त्वावर द्याव्या. जेणेकरून वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही

            मनोज रामेश्वर सरोदे
          युवा प्रयोगशील शेतकरी खैरी