आदिवासींचे पंढरपूर जागजई येथे 23 मे ला देवदर्शन व स्नान,विदर्भातील आदिवासी बांधव जगजई येथे येतात दर्शनास

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील जगजई येथे दरवर्षी आदिवासी भाविक भक्तांचे कुलदैवतांचे स्नान व देवदर्शन उत्सव आदिवासींचे पंढरपूर मनून जागजई येथे आनंद उत्साहात पार पडत असतो. हजारोच्या संख्येत भाविक भक्त देवदर्शन व स्नान याकरिता वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जागजई येथे हजर राहत असतात. येथे येणाऱ्या भाविक भक्तांकरीता बिरसा मुंडा,आदिवासी मंडळ, श्री राम मंदिर व विठ्ठल मंदिर व श्री निर्गुणशी महाराज मंदिर संस्थान तर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन करण्यात येते, तसेच श्री राम मंदिर व विठ्ठल मंदिर व श्री निर्गुणशी महाराज मंदिर संस्थान जागजई. बिरसा मुंडा संघटन राळेगाव अध्यक्ष श्री पेंदोर यांच्यातर्फे प्रशासनाला निवेदन देऊन पोलीस संरक्षण व आरोग्य विभाग व नदीपात्रामध्ये लाईव्ह बोर्ड इत्यादी सुविधा पुरवल्या जातात. पण काही भक्त इतर ठिकाणी स्नान करण्याचा प्रयत्न करतात . अशा प्रयत्नात मागील वर्षी दोन भाविकांचा नदीपात्रामध्ये करून अंत झाला सदर बातमी वृत्तपत्रामध्ये आली होती अशा समाज धार्मिक कार्यक्रमांमध्ये या प्रकारची दुर्घटना होऊन कोणत्याही परिवाराचा आधार गमावल्या जाऊ नये याकरिता परिसरातील व दुरून भावीक गावागावावरून येणाऱ्या सर्व आदिवासी भाविकांना. आदिवासीचे पंढरपूर श्री क्षेत्र जागजई येथे पवित्र स्नानाकरिता यावे असे आवाहन बिरसा मुंडा संघटन राळेगाव चे अध्यक्ष श्री पेंदोर व श्री राम विठ्ठल मंदिर जागजई व श्री निर्गुणशी महाराज संस्थान जागजई तर्फे करण्यात येत आहे.