गेल्या अनेक दिवसांपासून येथील बसस्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात गावातील देवी देवतांना सोडलेल्या कालवडी,कठाळ्या,गाय यांच्या सह गावातील काही शेतकऱ्यांचे देखील गोधन चोरीस गेल्याच्या घटना सतत घडल्या होत्या.
असाच प्रकार गुरुवारच्या मध्यरात्री येथील वार्ड नं ६ मध्ये घडला. येथील देवस्थानला सोडण्यात आलेल्या कठाळ्या(सांड) चोरांच्या निशाण्यावर होता.त्याला पकडण्यासाठी बंदुकधारी चोरट्यांनी प्रथम पाण्याच्या माध्यमातून गुंगीचे औषध दिले त्यानंतर तो कठाळ्या बेशुद्ध झाल्या नंतर त्याला उचलुन गाडीत टाकणारं तेवढ्यात एका इसमाने त्यांना हटकले असता चोरांनी त्या इसमास धमकावले व त्यांच्या वर बंदुक रोखली त्यामुळे घाबरलेल्या इसमाने घराशेजारी असणाऱ्या लोकांना आवाज देऊन जागे केले व झालेल्या घटनेची माहिती दिली.लोकांची संख्या वाढत असल्याने त्या बंदुकधारी चोरांनी त्या बेशुद्ध झालेल्या कठाळ्याला तेथेच सोडुन पळ काढला, घटनेच्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या मते त्या चोरांन कडे राखड्या रंगाचे महागडे एस यु व्ही वाहन होते आणि तेही आंध्रप्रदेश (ए पी) पासिंग चे होते चोरांनी सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या ही तिकडच मिळत असल्याचे बोलल्या जात आहे.घटनेच्या तासभर आगोदर यांनी बसस्थानकावर दोन वेळा ये-जा केल्याची माहिती आहे.कोणाला संशय येऊ नये म्हणून हे चोर महागड्या गाड्या चा वापर करताना दिसत आहेत.त्यामुळे पोलीस प्रशासनाने रात्री ची गस्त वाढविण्याची जनतेतुन मागणी होत आहे.
___*
▪️ माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून चोरांना बेड्या ठोकाव्या..!
यवतमाळ जिल्हा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची मदत घेऊन बरेच किचकट गुन्हे उघडण्यात हातखंडा आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री वार्ड क्रं ६ मध्ये कोण कोणते अंतर राज्याचे मोबाईल क्रमांक चालु होते ते शोधून त्या आधारे कसुन तपास केला तर निश्चितच ते बंदुकधारी चोर व त्यांच्या रॅकेट चा पोलिसांन कडुन पर्दाफाश होईल.
