


वरोरा चिमूर महामार्ग मागील कित्येक वर्षापासुन रखडलेला असून या मार्गाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही .कित्येक ठिकाणी खोदकाम केले आहे तर कित्येक ठिकाणी रस्त्याला मोठमोठ्या भेगा गेल्या आहेत.त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .
महिनाभर आधी झाला होता अपघात
चार चाकी वाहन रस्त्याच्या कडेला कोसळल्याने झालेल्या अपघातात चालक जागेवरच ठार
शुक्रवारी संध्याकाळी 10 वाजताच्या दरम्यान एका कारला मागून धडक दिल्याने चंद्रपूर येथील 3 डॉक्टर गंभीर जखमी झाले .कार चा दरवाजाच क्षत्रिग्रस्त झाल्याने दार तोडून आतील जखमींना बाहेर काढावे लागले .
यावेळी माजी सभापती राजू चिकटे व शेगाव येथील अक्षय बोंडगुलावर हे या मार्गाने प्रवास करीत असताना जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली .तत्काळ रुग्णवाहिका बोलवत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातातील जखमींना प्राथमिक उपचार करत जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
अपुऱ्या राजकीय इच्छा शक्तीने हा महामार्ग कित्येक वर्षांपासून ताटकळत ,याचा फटका मात्र सामान्य नागरिकांना बसत आहे
