
राळेगाव येथील मॉर्निंग ग्रुप च्या सदस्यांकडून संपूर्ण स्मशानभीचे सुशोभीकरण करण्याचा संकल्प हाती घेतला असून या कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली. या साठी लागणार संपूर्ण खर्च हा स्वतः मॉर्निंग ग्रुप च्या सदस्यांकडून करण्यात येत असून अपघातात निधन झालेले संजय पोटफोडे यांच्या कुटुंबियांना अकरा हजाराची आर्थिक मदत करून त्यांच्या मुलीचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च हा मॉर्निंग ग्रुप करणार आहे. मॉर्निंग ग्रुप चे सदस्य तसेच शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीप ठुणे यांच्या वाढदिवसा निमित्त स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करून त्यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सत्कार करण्यात आला. प्रत्येकाच्या वाढदिवसाला इतर खर्च नं करता प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे एकत्र निधी गोळाकरून तो राळेगाव मध्ये विविध सामाजिक उपक्रम तसेच गरजवंताना मदत करण्याचे ठरविण्यात आले यावेळी संपूर्ण मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व मित्रमंडळी उपस्थित होते.
तालुका व शहर काँग्रेस कमिटी कडून टी शर्ट चे अनावरण
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे काँग्रेस नेत्यांचे फोटो व सिम्बॉल असलेल्या टीशर्ट चे अनावर करण्यात आले. या संपूर्ण टीशर्ट चा इतर कामगार तसेच पक्षातील संपूर्ण कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आला यावेळी अरविंदभाऊ वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओ बी सी सेल, राजुभाऊ तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका कॉग्रेस, शहर अध्यक्ष प्रदीप ठुने, न.प.उपाध्यक्ष जानराव गिरी सर्व काँग्रेस पदाधिकारी, संचालक कृषीउत्पन बाजार समिती, नगरसेवक अनेक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.
