
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात असणाऱ्या बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेल्या आनंदवनात 24 वर्षीय तरुणीची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. ही घटना काल 26 जूनला रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेत हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आरती दिगंबर सिंह चंद्रवंशी असे आहे. ही तरुणी घटस्फोटीत असल्याचे कळते ही घटस्फोटित तरुणी आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये आई-वडिलांसोबत वास्तव्याला होती.तिचे वडील दिगंबरसिंह चंद्रवंशी दिव्यांग (अंध) असून गेल्या 40 वर्षांपासून ते आनंदवन येथे राहतात.
काल 26 जून रोज बुधवारला ते आपल्या पत्नीसह उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यावर त्यांना घराच्या बाथरूममध्ये आरतीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. त्यामुळे ही घटना नेमकी केव्हा घडली तसेच हत्या करण्यामागचा उद्देश काय याचा शोध घेणे आवश्यक आहे. मृत तरुणीच्या गळ्यावर मोठ्या प्रमाणात घाव असल्याची प्राथमिक माहिती आहे
प्रेमात धोका आणि खूनाने अंत
कुष्ठरोग्यांची सेवा ही जनसेवा म्हणून कार्य करणाऱ्या आनंदवनातील आश्रमात मृतक मुलीचे आई-वडील राहत होते, त्यांच्यासोबत 24 वर्षीय आरती ही राहत होती, आई-वडिलांचा उपचार करतेवेळी आरती च्या नजरा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणाऱ्या समाधान माळी सोबत जुळल्या.
समाधान हा स्वतःचा उपचार आनंदवनात करण्यासाठी आला होता, विशेष म्हणजे उपचार घेत तो केअर टेकरचे कामही करायचा.
. वरोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पोस्टमार्टम साठी मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला व पोस्टमार्टम नंतर शव नातलगांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेमुळे शांतता व माणुसकीचा संदेश देणा-या आनंदवनात खळबळ माजली आहे.
कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात आलेल्या आनंदवनात यापूर्वी अशा प्रकारची घटना घडलेली नाही येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि, विनोद जांभळे,पो,उपनिरीक्षक धीरज मसराम, पोहेका,दिलीप सुर,दिपक दुधे,किशोर बोधे, आदी पोलीस कर्मचारी घटनेचा तपास करत 24 तासांमध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध 302 अंतर्गत गुन्हा दाखल करत शोध घेऊन आरोपी याला ताब्यात घेऊन आरोपी नामे समाधान माळी रा.चोपडा जळगाव ह.मु.वरोरा त्याला ताब्यात घेऊन घेऊन विचारपूस केली असता गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.
26 जून ला आरतीचे आई वडील वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काही कामानिमित्त गेले होते, याबाबत समाधान ला माहिती मिळाली, त्यानंतर त्याने आरती च्या घरी प्रवेश करीत पुन्हा वाद सुरू केला, त्यावेळी समाधान हातात चाकू घेऊन आला होता, त्याने कशाचाही विचार न करता आरतीच्या गळ्यावर, हातावर चाकूने सपासप वार केले, अति रक्तस्त्राव झाल्याने आरती जागेवर कोसळली, यामध्ये तिचा मृत्यू झाला.
रात्री 8 ते 8.30 दरम्यान आरतीचे आई-वडील घरी आले असता बाथरूम जवळ रक्ताच्या थारोळ्यात आरतीचा मृतदेह पडला होता, आरतीची हत्या झाली ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली, वरोरा पोलिसांना सूचना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा करीत तपास सुरू केला.
तपासचक्र वेगाने फिरवत 24 तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेत अटक केली
