
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मध्य प्रदेश सरकारच्या धरतीवर गरीब महिलांना मदत तसेच त्यांचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणांमध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना लागू केली असून या योजनेकरिता महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार असून या योजनेचा लाभ मिळण्याकरिता आज पासून ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रिकेला सुरुवात करण्यात आली असून पहिल्या दिवशी सेतू केंद्रावर महिलांची झुंबड दिसून येत आहे.
लाडकी बहीण या योजनेकरिता दिनांक १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत अर्ज करावयाचे असल्याने या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता अवघे पंधरा दिवस मिळत असल्याने या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता महिलांनी उत्पन्नाचा दाखला,आधारकार्ड इतरही कागदपत्र जुळवाजुळव करण्यासाठी महिला धावपळ करत असून पहिल्याच दिवसापासूनच सेतू केंद्रावर महिलांनी एकच गर्दी केली आहे.
