तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

दुबार पेरणी,अतीवृष्टी चा तडाखा, वाढत जाणारं कर्जापोटी आदित्य गजानन डोमकावळे (२३ वर्ष )रा पिंपरी दुर्ग याने विषारी द्रव्य शेतात प्राशन करुन जीवनयात्रा संपवली आहे.
सन् २०२१ मध्ये आदित्य च्या वडिलांनी, गजानन यांनी सुध्दा कर्जापोटी आत्महत्या केली होती.
सोसायटी चे पन्नास हजार रुपये र तीन लाख रुपये खाजगी कर्ज असल्याचे सांगितले आहे.
अडीच एकर कोरडवाहू शेती, वृध्द आई, दोन बहिणी सह बराच मोठा आप्तपरिवार आहे…