वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल यांना दिला शब्द….

राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी नामदार मुश्रीफ यांची घेतली भेट…
हिंगणघाट/प्र.
शासनाने घोषित केलेल्या अकरा वैद्यकीय महाविद्यालया पैकी हिंगणघाट येथील मंजूर वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची जागा निश्चित होत नसल्याने चर्चेत आहे….
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले व जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी हिंगणघाट शहरात उपजिल्हा रुग्णालयाला लागूनच शासनाची जागा उपलब्ध असून या जागी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करावे किंवा शासनाच्याच हिंगणघाट शहरालगतच्याच जागेवरती हे वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करावे अशी मागणी केली.. आज अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी याबाबत प्रश्न देखील उपस्थित केला… यानंतर आमदार जयंत पाटील यांच्यासह अतुल वांदिले व सुनील राऊत यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत संपूर्ण उपलब्ध जागेची माहिती कागदोपत्री समजून सांगत उपलब्ध जागेचे कागदपत्र व निवेदन सादर केले.. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हिंगणघाट येथे मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे खासगी जागेवर होणार नसून ते शासकीय जागेवरतीच निर्माण केले जाईल अशी हमी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ .जयंत पाटील यांना दिली.. यामुळे आता हिंगणघाट शहरात असलेल्या शासकीय जागेवरतीच हे वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होण्याची वाट मोकळी झाली आहे…
वेळा येथील साखर कारखान्याची जागा दोन महिन्यांपूर्वी विकत घेऊन त्यातील 40 एकर जागा दान दाखवीत उर्वरित दीडशे एकर जागेच्या माध्यमातून मोठा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पत्रकार परिषद घेत आमदार समीर कुणावर यांच्यावर लगावला होता. हिंगणघाट शहरातील रोजगार निर्मितीसाठी व हिंगणघाट शहराच्या प्रगतीसाठी म्हणून असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहराच्या बारा किलोमीटर अंतरावर आपल्या उद्योजक मित्रांसाठी पळविण्याचा आमदारांचा डाव आहेः असे देखिल अतूल वांदीले आरोप लावला बोलले होते.. यानंतर पत्रकार परिषद घेऊन आमदार समीर कुणावार यांनी याबाबत खुलासा करण्याचा प्रयत्न केला ,मात्र पत्रकारांकडून त्यांना इतर शासकीय जागेबाबत विचारले असता आमदार समीर कुणावार यावर उत्तर देण्यास असमर्थ ठरणे… नांदगाव (बो) येथील नागरिकांनी देखील आता नांदगाव येथे असलेल्या शासकीय जागेवर मेडिकल कॉलेज निर्माण करावे अशी मागणी केली आहे… नांदगाव प्रमाणेच कोल्ही येथे असलेल्या जागेबाबत संपूर्ण माहिती नामदार हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत अतुल वांदिले यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली असून हिंगणघाट शहरात उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या जागेला प्रथम प्राधान्य देत उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट शहरातच उभारावे अशी मागणी अतुल वांदिले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांच्याकडे पोहोचवली आहे .. हसन मुश्रीफ यांच्याकडून देण्यात आलेल्या शब्दानंतर आता हिंगणघाट शहरातील वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच निर्माण होण्याची वाट मोकळी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे…
