कृषी वीज बिलातून सुटका पण थकबाकीचे काय?
शेतकऱ्यांचा सवाल ; पाणी मुबलक असूनही ऊस व केळी सारख्या पिकापासून वंचित

सहसंपादक: रामभाऊ भोयर

पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने शेतकऱ्यांना यापुढे कृषी वीज बिल येणार नाही , कृषी वीज बिलातून शेतकऱ्याची सुटका झाली असे जाहीर केले पण थकबाकी विषयी काही घोषणा न झाल्याने शेतकऱ्याची वीज बिलातून सुटका झाली पण थकबाकीचे भूत मानगुटीवर असल्याने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना पाहिजे तसा मिळणार नाहीत कृषी विजेचा विचार केल्यास कृषी विजसंबंधी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्याचदा ट्रान्सफॉर्मर जळले असते तर ते अनेक महिने बदलून मिळत नाहीत वारंवार लाईन जाते खाजगी लाईनमन कडून लाईन दुरुस्त करून घ्यावी लागते विजेचा लपंडाव सारखाच सुरू असतो त्यामुळे बागायतदार शेतकरी पाणी मुबलक असूनही केळीसारखे पीक घेऊ शकत नाही याशिवाय विजेचे बिल हे अव्वाच्या सव्वा येत असते तीन महिन्यानंतर शेतकऱ्याला कृषी वीज बिलासंबंधी मेसेज येतो बिल न भरल्यास त्यावर व्याज सुद्धा आकारल्या जाते अव्वाच्या विज बिल येत असल्याने व उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक शेतकरी वीज बिल भरू शकत नाहीत यामुळेच शेतकऱ्यांना मायबाप सरकारकडून यावेळी थकीत वीज बिल माफीची अपेक्षा होती पण सरकारने यापुढे विजेचे बिल येणार नाही असे म्हणून व थकबाकीचे कुठलेही आश्वासन न दिल्याने निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाला मायबाप सरकारने पाणी पुसले एवढे निश्चित एकीकडे शासन शेतीला उद्योग म्हणते पण उद्योगाच्या कुठल्याही सोयीसुविधा शेतीला मिळत नाही उद्योगाला विज बिल माफ होते कमी किमतीत मिळते खंडित न होणारा वीज पुरवठा मिळतो दुसरीकडे मात्र अशा कुठल्याही सुविधा कृषी विज संबंधी शेतकऱ्यांना मिळत नाही अनेक वेळा उद्योगाची वीज बिल माफ केले जाते अशाच पद्धतीच्या माफीची अपेक्षा शेतकऱ्यांना यावेळेस होती पण ती न मिळाल्याने शेतकऱ्याची घोर निराशा झाली आहेत जुने वीज बिल अंगावर असल्याने नवीन विज बिलातून सुटका या योजनेचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही जेव्हा शेतकऱ्याची वीज कापायला महावितरणचे अधिकारी येईल तेव्हा ते जुन्या वीज बिलाची मागणी करतील व ते भरल्याने शेतकऱ्यांची वीज कापली जाणार विजबिल हे तीन महिन्याने येत असते तीन महिन्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक आहेत त्यामुळे पुढे कोणते सरकार येणार हे निश्चित नाही त्यामुळे घोषणा करायची व पुढचे पुढे पाहू अशी मानसिकता सरकारचे असल्याचे या निर्णयावरून दिसते, प्रतिक्रिया प्रदीप ठुने शेतकरी, महावितरण कडे कृषी पंपाचे कनेक्शन मागण्यासाठी गेले असता महावितरणसोलर चा कृषी पंप घ्यावयास लावते अनेक वर्षापासूनच्या कृषी वीज जोडणी पेंडिंग आहेत त्या त्यांनी तात्काळ कराव्यात नवीन विज द्यायचीच नाही व विज बिलातून सुटका केली हे दाखवायचं हे कोडे न समजण्याच्या पलीकडचे आहे जोपर्यंत थकीत वीज बिल माफ होणार नाही तोपर्यंत नवीन बिलातून सुटका या योजनेचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना होणार नाही, गुणवंत काळे शेतकरी, निवडणुकीच्या तोंडावर शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य तेव्हाच ठरेल जेव्हा ते थकीत वीज बिल माफ करतील माफी शिवाय शासनाने घेतलेला हा निर्णय दळीशिवाय वरण असा आहे त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही शासनाने थकीत वीज बिल माफ करून नवीन वीजबिलातून शेतकऱ्याचे सुटका करावी.