
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील जळका येथील भारतीय सैन्य दलात २१वर्षे सेवा देऊन भारतीय सीमेचे रक्षण करणारे शंकर सायसे हे सेवानिवृत्त झालेत. सेवानिवृत्तीनंतर ते स्वगृही राळेगाव तालुक्यातील जळका येथे पोहोचले असता, त्यांचा जळका येथील घरी जाऊन स्वपत्नी सत्कार करण्यात आला.
देशाचे संरक्षण करण्याचे महान कार्य पार पाडून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत राळेगाव येथील नवोदय क्रीडा मंडळाचे सदस्य व तहसीलदार अमीत भोईटे यांनी माझा घरी येऊन सत्कार केला हा क्षण माझ्यासाठी खुप आनंददायी आहे असे सैनिक शंकर सायसे यांनी सत्काराला उत्तर देताना दीले . यावेळी तहसीलदार अमीत भोईटे यांनी बोलतांना सांगितले की सेवानिवृत्ती सैनिकांचा सत्कार करण्याचा उपक्रम माझी समोर ज्या ठिकाणीं नियुक्ती होईल त्याठिकाणी नियमित सुरू ठेवील असे बोलुन दाखवले व सोबतच शहीद भगतसिंग ग्रुप तर्फे सत्कार मुर्ती यांना शहीद भगतसिंग यांची प्रतिमा भेट देण्यात आली.या सत्कार कार्यक्रमांसाठी राळेगाव येथील तहसीलदार अमित भोईटे, विनय मुनोत, वीरेंद्र वाऱ्हेकर, गजानन बलांद्रे, माजी सैनिक गुरुदास नगराळे, सचिन एकोनकर, प्रफ्फुल कोल्हे, गजानन काळे, नितीन मुडे.आशीष महाजन, निलेश मिटकर,महेश भोयर शहीद भगतसिंग ग्रुपचे हेमंत दोडेवार, प्रदून्या इंगोले,रोहीत पिंपरे, सुनील कुऱ्हे, मोतीलाल आडे व गावातली नागरीक उपस्थित होते.
