
सहसंपादक : – रामभाऊ भोयर
दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी झाडगाव येथील संत तुकडोजी महाराज मंदिर परिसरात सावली महिला प्रभास संघ, वरद प्रभाग यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला परिसरातील महिला बचतगट सदस्य, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित मा. प्रा. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की – “आर्थिक स्वावलंबनासाठी छोट्या छोट्या बचतीतून मोठे उत्पन्न घडवता येते. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी केवळ घर चालवण्यापुरतेच नव्हे तर समाज उभारणीतही मोठे योगदान द्यावे. तुमच्या उपक्रमांना माझे नेहमीच पाठींबा राहील.” त्याचबरोबर तहसीलदार अमित भोईटे, तालुका व्यवस्थापक मिलिंद चोपडे सर व बीडीओ केशव पवार यांनीसुद्धा महिलांना मार्गदर्शन केले. सभेचे सुत्रसंचालन सौ. कविता धुर्वे यांनी केले तर प्रभाग समन्वयक दिनेश कोवे यांनी आभार मानले. यावेळी विशेष उपक्रम म्हणून वरद प्रभाग तर्फे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप मा. मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये केशव पवार (बीडीओ), माजी नगराध्यक्ष बबन भोंगारे, चित्तरंजन कोल्हे (जि.प. सदस्य), सतीश टारपे (तालुका अध्यक्ष), छायाताई पिंपरे, रामदासजी किन्नाके, उषाताई भोयर, प्रशांत भाऊ तायडे,डॉक्टर कुणाल भोयर, सविता पोधदुखे, शोभाताई इंगोले, प्रवीण भाऊ कोकाटे, सुनील जिद्धेवर, प्रकाश पालवाणी, सोनालीताई पटेलपैक, रत्नमाला आडे, मंगला लढाई, मिलिंद चोपडे, धन्वंत शेंडे, दिनेश कोवे, अविनाश तरडे, गजानन आत्राम, प्रफुल पटेलपैक, वैशाली पटेलपैक, वर्षा वाघरे, कविशर लडी, मंगेश पुडके, जीवन कुमरे, काशिनाथ भगत, श्यामलाल येडस्कर तसेच गावातील महिला बचतगट सदस्य व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या सभेमुळे महिला बचतगटांना नवे बळ मिळाले असून गावातील महिला आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगत होण्यासाठी प्रेरित झाल्या आहेत.
