
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पावसाळा सुरू होऊन आता
चौथे नक्षत्र सुरू झाले असून दहा बारा दिवसापासून जिल्ह्यासह काही भागात धो-धो पाऊस पडत आहे त्यामुळे शेतात पाणीच पाणी साचले असून शेती जलामय झाली असल्याने शेतातील पिके करपण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यात सुरवाती पासून पाऊस समाधान कारक असल्याने शेतातील पिके तरारली होती मात्र आता दहा बारा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील कामे खोळंबली असून शेतात तणांची वाढ मोठ्या प्रमाणत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे. जर पावसाने उघड दिली असती तर डवरणी खुरपणी झाली असती मात्र सतत पडणाऱ्या पावसाने सर्व कामे थांबली आहे. सध्या शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केल्याने सर्व महिला लाडकी बहीण योजनेचे फार्म भरण्याकरिता धावपळ करीत आहे त्यामुळे मजुरवर्ग वेळेवर मिळत नसल्याने शेतीकामाला ब्रेक बसत आहे. दुसरीकडे अधिकचे पैसे देऊनही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना घरातील लहान-मोठ्या सदस्यांना शेतीकामासाठी घेऊन जावे लागत आहे.
