अचानक आलेल्या पावसाने नागरिकांच्या घरात शिरले पाणी

यवतमाळ शहरालगत असलेली ओम नमो नगर व जनक नगरी डी मार्ट जवळ वडगाव यवतमाळ येथे नागरिकांच्या घरात घुसले पाणी नगरपालिकेला वारंवार तक्रार करून सुद्धा नगरपालिका व नगरसेवक त्यावर दखल घेत नाही जनक नगरी आणि ओम नमो नगर मधून जाणारा नाल्याचा ओढा हा पाऊस आल्यानंतर दोन्ही थोड्या भरून वाहतो त्यामुळे या वस्तीत लोकांच्या घरात नेहमीच पाणी शिरत असते अशा परिस्थितीत त्या नागरिकांना घराबाहेर सुद्धा निघता येत नाही त्यात या वस्तीला लागून असलेले डी मार्ट यांनी बनवलेला मेन हायवे पासून जो सिमेंटचा रस्ता आहे ह्या रस्त्याचा पूर्ण उतार जनक नगरी आणि ओम नमो नगरीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे केला असून पावसाळ्यात डी मार्ट च्या रस्त्याचे पूर्ण पाणी ओम नमो नगर व जनक नगरीच्या रस्त्यावर येते आणि ह्या रस्त्यावरचा पूर्ण मुरूम वाहत जाते आणि इथल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरते यावर नागरिकांचे मत पडले की नगरपालिकेने डी मार्ट त्यांना एक नोटीस देऊन डी मार्ट वरच्या रस्त्याचे पाणी दुसरी करून वळवण्यात यावे अन्यथा या नगरी मधले नागरी डी मार्ट मध्ये उपोषणाला बसेल असा इशारा इथल्या नागरिकांनी व्यक्त केला आहे