सोनामाता हायस्कूल चहांद येथे इको क्लब ची स्थापना

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सोनामाता हायस्कूल चहांद तालुका राळेगाव येथे “मेरी लाईफ मिशन” या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत इको क्लब ची स्थापना करण्यात आली. या मिशन अंतर्गत वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचे जतन, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचे उपयोजन, ऊर्जेची बचत व संवर्धन करणे, यासारखे विविध उपक्रम घेण्यात येतात. या उपक्रमांतर्गतच दिनांक 6 ऑगस्ट 2024 ला सोनामाता हायस्कूल चहांद च्या परिसरामध्ये विविध फळझाडे व फुल झाडांची लागवड विद्यार्थी व शिक्षक यांच्या मदतीने करण्यात आली. तसेच वर्ग पाच ते दहा चे सर्व विद्यार्थी यांतून इको क्लब ची स्थापना करून त्याच्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक माननीय धोबे सर, चिव्हाने सर, कांबळे सर, शिवणकर सर, दांडेकर सर, सावंत सर, गोवारदिपे मॅडम,गावंडे मॅडम, देवानंद सोनवणे व प्रथमेश राऊत हे उपस्थित होते. इको क्लब चे कार्य कशा पद्धतीने चालते याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक माननीय धोबे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.