
प्रतिनिधी ::प्रवीण जोशी
श्रावण महिन्यात अनेक सण
उत्सव असतात त्या निमित्याने या महिन्याला अनन्य साधारण महत्व असते ढाणकी शहरापासून पासून जवळ असलेल्या हरदडा येथे श्री शंभू शंकराचे अत्यंत जागृत जाज्यवल्य असे हेमाडपंथी मंदिर आहे. विशेष म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण
होतात अशी ख्याती असल्यामुळे अगदी दूरवरून भक्त गण दर्शनासाठी येतात.
तसेच या ठिकाणी विविध भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामधे कीर्तन भजन असे विविध कार्यक्रम या महिन्यात आयोजित करतात. त्यामुळे पंचकोशितील सर्व भाविक भक्तांना या बाबीचा लाभ होत असतो. निसर्गाने सुधा या ठिकाणी आपले सौंदर्य अगदी यथेच्छ दिले आहे.
भक्तांना यावेळी दर्शनाचा लाभ झाल्यामुळे एक वेगळाच उत्साह भाविकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असताना दिसत होता. तसेच यावेळी महादेवाच्या पिंडीवर मनमोहक फुलांची सजावट आणि पूजाविधी शिव भक्ताचे लक्ष वेधून घेताना दिसत होते. हरदडा हे हेमाडपंथी मंदिर म्हणून विदर्भात सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच या महिन्यामध्ये विविध वनस्पतीच्या फुलांना आणि पानांना सुद्धा विशेष महत्त्व असते. श्रावणात सण उत्सवांची सुद्धा मांदियाळी असते नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षा बंधन, पोळा, इत्यादी सणाची रेलचेल असल्या कारणाने या महिन्यात करटुले आघाडा, केना, चिरोटी, घोळ, जिवती, करादे, इत्यादी फळाला व फुलांचा विशेष मान असतो.
