वडगाव प्रभाग क्रमांक सहा मध्ये पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात

ओम नमो नगर वडगाव प्रभाग क्रमांक सहा या नगरीत गेल्या काही वर्षापासून येथे नागरिक वास्तव्य असून इथल्या नागरिकांना मात्र नगरपालिकेची कुठली मूलभूत सुविधा नाही त्यामुळे या नगरीचा. पावसाळ्यात वारंवार. गंभीर प्रश्न निर्माण होतो या नगरीमध्ये मध्यभागी वाहणारा नाला पावसाळ्याच्या पाण्याने भरून जातो. आणि नागरिकांच्या घरात पाणी घुसते त्यामुळे इथल्या नागरिकांचे खूप मोठे हाल होतात अशा परिस्थितीत सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही कुठल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देत नाही नगरपालिकेच्या प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा याच्यावर दखल कोणी घेत नाही. या प्रशासनाला कधी जाग येणार असे प्रश्न नागरिकांच्या मनात रुजून बसले आहे त्यामुळे येथील नागरिक प्रशासनाचा भोंगळ कारभाराला.पाहून त्रस्त झाले आहे वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगरसेवक आणि प्रशासन या नगरीकडे कधी लक्ष वेधणार याची सातत्याने वाट पाहत आहे. घरात पाणी घुसल्यानंतर सर्वांचे घरातलं अन्नधान्य पुराच्या पाण्यामुळे खराब झाले आहे. रोगराईचे वातावरण पसरले आहे चार-पाच जणांना डेंगू चा आजार झाला आहे या पुराच्या पाण्यामुळे लोकांच्या घरात साप विचू शिरतात. त्यामुळे जीवाला जीवित हानी होऊ शकते. याकडे प्रशासन काही लक्ष घालत नाही आहे यामुळे राष्ट्रसंत विचार.मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख व कार्यकर्ते. सुनील परचाके रामा राठोड प्रफुल देवताळे सुधीर मसराम गोविंदा पुरी या सर्व कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासकाला बोगस प्रशासक असे म्हणून या नगरीमध्ये सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा नगरपालिकेवर तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे