डोमाघाटावर स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर जत्रेचे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सती सोनामाता डोमाघाट येवती येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.या दिवशी महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड तसेच तालुक्याच्या काटोल,करमाळा व इतरत्र ठिकाणाहून वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या श्री संत सती सोनामाता यांचे मंदिर असून या ठिकाणी ऋषीपंचमीच्या निमित्ताने वर्धा नदीच्या पात्रात आंघोळ करून दर्शन घेण्यासाठी तोबा गर्दी जमली होती.या जत्रेच्या ठिकाणी संस्थानच्या वतीने भाविकांची हेळसांड होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती.सोबतच वडकी येथील ठाणेदार सुखदेव भोरखडे अणि सहकारी पोलिसांनी विशेष संरक्षणाची जबाबदारी पार पाडली या निमित्ताने डोमाघाट येवती या गावाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून आले.