वृत्तपत्र विक्रेत्यांशी वाद घालून दिली जिवे मारण्याची धमकी, राळेगाव पोलीसात गुन्हा दाखल.


राळेगाव तालूका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


येथील दैनिक देशोन्नती या वृत्तपत्राच्या विक्रेत्यांशी येथीलच एका इसमाने कारण नसताना वाद घालून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी राळेगाव पोलीसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.हा प्रकार शुक्रवारी २३ जुलै रोजी सकाळी घडला.
राळेगाव येथील दैनिक देशोन्नती या वृत्तपत्राचे विक्रेते विनोद रामदासजी काळे (५३) हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी बसस्थानक परिसरात वृत्तपत्र पार्सलची प्रतिक्षा करीत असतांना येथीलच इसम विनायक महाजन (३५) यांनी तु माझ्या बाबत का गोष्टी केल्या हे कारण पुढे करून वाद घातला व विनोद काळे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी वृत्तपत्र विक्रेते विनोद काळे यांनी राळेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनायक महाजन यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.