
सर्व संबंधित पदाधिकारी व शेतकरी शेतमजूर बंधू भगिनींनी कांग्रेस पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन
राळेगाव तालुक्यातील काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे शिवसेना, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका पदाधिकारी,सहकार क्षेत्रात कार्यरत पदाधिकारी,महाविकास आघाडीच्या सर्व मान्यवर मंडळीं, सक्रिय कार्यकर्ते आणि शेतकरी शेतमजूर बंधू भगिनींना विनंती वजा आवाहन करण्यात येत आहे की दिनांक 24/9/2024 रोज मंगळवारला दुपारी ठिक 12 वाजता शेतकरी शेतमजूर यांच्या मागण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय संजयभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात करण्याचे ठरले आहे तर या मोर्चात आपल्या मागण्या पोटतिडकीने शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.हा मोर्चा काँग्रेस पक्षाच्या राळेगाव येथील कार्यालयातून निघून राळेगाव शहरातून उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या कार्यालयावर धडकणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आदरणीय प्राध्यापक वसंतराव पुरके सर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, अँडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय प्रविणभाऊ देशमुख, शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय राजेंद्रभाऊ गायकवाड, शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख आदरणीय किशोरभाऊ इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षा सौ.वर्षाताई निकम ताई, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष इंजिनीअर अरविंदभाऊ वाढोणकर , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंदभाऊ इंगोले, वसंत जिनिंग राळेगाव येथील अध्यक्ष नंदकुमारजी गांधी, नगराध्यक्ष रविंद्रजी शेराम, उपनगराध्यक्ष जानरावजी गिरी इत्यादी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबतच सर्व शेतकरी शेतमजूर बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, शिवसेनेचे राळेगाव तालुका प्रमुख विनोदभाऊ काकडे, शहरप्रमुख इम्रान खान पठाण, तसेच शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राळेगाव तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे यांनी केले आहे
