
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सध्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या समस्या घेऊन सतत शासनस्तरावर प्रयत्न करत असून सध्याच्या परिस्थितीत यवतमाळ वेतनपथक कार्यालयाने दिनांक 15 मार्च पर्यंत आलेली सर्व प्रलंबित वैद्यकीय बिले कोषागार कार्यालयात पाठविली होती परंतु तांत्रिक अडचणींमुळे ही बिले वापस करण्यात आली अशी माहिती वेतन पथकाकडून मिळाल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर यांनी 20 मार्चला कोषागार अधिकारी राठोड साहेब यांची आमदार सुधाकरराव अडबाले सर यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले तसेच प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर यांनी आमदार सुधाकरराव अडबाले सरांकडे या प्रश्नाचा पाठपुरावा केला.त्यांनुसार अडबाले सरांनी ज्वाईन डायरेक्टर यांची मंत्रालयात भेट घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील वैद्यकीय बिलांची समस्या तात्काळ सोडविण्याबाबत सुचित केले.त्यानुसार आज मुंबई येथील वरीष्ठ कार्यालयाने कोषागार कार्यालयाला बिल घेण्याचे/ स्विकारण्याचे निर्देश दिले.त्यानुसार कोषागार अधिकारी यांनी बिले पाठविण्याबाबत झालेल्या घडामोडी सांगितल्या व आजच बिल जमा करण्यासंदर्भात सांगितले.त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील वैद्यकीय बिलाचा साडे तीन कोटी रुपयांची प्रलंबित बिले जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला . शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही संघटना शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले सर आणि प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर यांच्या प्रयत्नामुळे हे काम झाले असून ज्या शिक्षकांनी 15 मार्च पर्यंत बिले सादर केली या सर्वांची बिले येत्या तीन ते चार दिवसांत जमा होणार असल्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर व जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर यांनी माहिती दिली असल्याचे उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.