
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्य शिक्षक संघाच्या वतीने दिनांक 24.09.2024 रोजी राज्य शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप कडू यांनी यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुक्यातील अनेक शाळेना भेटी देऊन तेथील शिक्षक कर्मचारी वर्ग आणि राज्य शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांन सोबत हितगुज केले.राज्य शिक्षक संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचे उत्तम नियोजन शाळा भेटीदरम्यान दिसून आले.राळेगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश शाळा व महाविद्यालय राळेगाव.,संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव.नेताजी हायस्कूल राळेगाव श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव.,पौर्णिमा माध्यमिक शाळा सावनेर.,लोक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय खैरी.
या शाळेना भेटी दिल्या.
भेटीदरम्यान राज्य शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप कडू सर यांचे प्रत्येक शाळेत उस्फुर्त स्वागत केले. शाळेच्या भेटीदरम्यान दिलीप कडू सर यांच्या सोबत राज्य शिक्षक संघाचे मार्गदर्शक सुरेंद्र कडू सर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष योगेश वानखडे सर, यवतमाळ जिल्हा सचिव नितिन जुणूनकर राळेगाव तालुका अध्यक्ष राकेश नक्षीने सर, तालुका उपाध्यक्ष पवन गलाट सर, सचिव प्रवीण कारेकर सर, सहसचिव अमोल सेरकी सर व राज्य शिक्षक संघाचे अमरावती महानगराचे सचिव प्रदिप नानोटे भेटी दरम्यान सोबत होते…
