
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शहरातील कांग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते, प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान, मदतीला धावून जाणारे
राजेश प्रभाकर नागतुरे यांना
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांना कांग्रेस ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या हस्ते तेलंगणाचे कांग्रेस पक्षाचे आमदार डॉ राजेश रेड्डी, दुसरे आमदार बहादूर साहेब यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र राजेश प्रभाकर नागतुरे यांना देण्यात आले. .ते त्यांच्या निवडीचे श्रेय महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ॲड प्रफुल्ल मानकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर अरविंद वाढोणकर कांग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांना देत असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे हे विशेष…
