
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे बऱ्याच काळ ते अध्यक्ष होते आपल्या कार्यकाळांमध्ये त्यांनी टाटा समूहाला एक नवी उंची प्राप्त करून दिली पण हे करत असतानाच लोक कल्याण आणि राष्ट्रहित यालाही रतन टाटा यांनी तितकेच प्राधान्य दिले मोठ्या पदावर काम करत असताना तसेच गर्भ श्रीमंत असताना सुद्धा रतन टाटा यांच्या वागण्या बोलण्यात कायम विनम्रता होती यामुळे रतन टाटा भारतीयांच्या कायम स्मरणात राहतील असे विचार न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉक्टर अर्चनाताई धर्मे यांनी न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये मांडले सर रतन टाटा यांचा श्रद्धांजलीपर कार्यक्रम शाळेत घेण्यात आला यावेळी अध्यक्ष म्हणून सौ धर्मे बोलत होत्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य विजय कचरे उपप्राचार्य सुरेश कोवे पर्यवेक्षक सुचित बेहरे अरुण कामनापुरे उपस्थित होते भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती सुद्धा यावेळी साजरा करण्यात आली उपस्थित विद्यार्थ्यांना रतन टाटा यांच्या विषयी माहिती देताना डॉक्टर सौ अर्चनाताई धर्मे पुढे म्हणाल्या रतन टाटा यांना समाजातील प्रत्येक जीवाची जाणीव होती त्यांच्या कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ते फॅमिली मेंबर प्रमाणे वागणूक द्यायचे मुक्या प्राण्यावरही रतन टाटा यांचा विशेष जीव होता पाळीव कुत्र्यांप्रमाणेच त्यांनी भटक्या कुत्र्यांसाठी सुद्धा विशेष सुविधा पुरवल्या होत्या रतन टाटा यांच्या प्रयत्नामुळे भारताने औद्योगिक क्षेत्रात विशेष प्रगती केली तसेच आपल्या कार्यातून रतन टाटा यांनी टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात असलेला विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ ठरवला रतन टाटा यांना या अगोदरच भारतरत्न द्यावयास हवा होता पण प्रत्येक भारतीयांच्या मनात रतन टाटा यांचे जे स्थान आहे तेभारतरत्न या पुरस्कारापेक्षा निश्चितच कमी नाही रतन टाटा हे युगपुरुष होते विद्यार्थ्यांनी रतन टाटा यांच्यापासून जीवनात कधी हार न मानणे कुठलेही काम प्रामाणिकपणे करणे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ह्या गोष्टी आत्मसात करायला हव्या असे आवाहन धर्मे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेश काळे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर रतन टाटा यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाला शाळेतील कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती
