पिक विम्याचे पैसे द्यावे राळेगाव ग्राविकाची मागणी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यावर्षी अतिवृष्टीने राळेगाव शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून झाले पण अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशा मागणीचे निवेदन राळेगाव ग्राविकाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले यावर्षी अतिवृष्टीने काही शेतकऱ्यांचे पीक हे जमिनीवरती आल्या आल्याच मरण पावले तर काही शेतकऱ्यांच्या पिकाचे पीक मोठे झाल्यावर नुकसान झाले नाल्याकाठच्या शेताचे तर बरेच नुकसान झाले अतिवृष्टीने काही शेतकऱ्यांचे शेत हे पडीत आहेत नुकसान ग्रस्त सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहेत शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या साईट वरती जाऊन ऑनलाईन तक्रार सुद्धा टाकली आहेत तक्रारीची दखल संबंधित विमा कंपनीने घेत आपल्या प्रतिनिधीला पाठवले प्रतिनिधीने नुकसानीचा पंचनामा करून नुकसानीची टक्केवारी ठरवली व तशा आशयाचे पत्र शेतकऱ्याला दिले शेतकऱ्यांचे नुकसान हे जुलै ऑगस्ट महिन्यातील आहेत विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पाहणी ही तेव्हाच केली आहे पण अजून पर्यंत नुकसान भरपाई मात्र शेतकऱ्याला मिळाली नाही नुकसान झाले हे जर कंपनीला मान्य आहेत तर नुकसान भरपाई सुद्धा कंपनीने द्यावयास हवी कंपनी नुकसान भरपाई देण्यासाठी इतका वेळ का घेत आहे सद्यस्थितीत ऑक्टोबर महिना हा संपण्याच्या मार्गावर आहे शिवाय दिवाळी ही तोंडावरती आली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पैसे पिक विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तहसीलदार अमित भोईटे यांना निवेदन देताना ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी कृष्णाजी राऊळकर विनायक नगराळे तातेश्वर पिसे अशोक पिंपरे गजानन पाल विनोद नरड गजानन महाजन प्रभाकर राऊत प्रकाश मेहता हे उपस्थित होते तालुका कृषी अधिकारी यांना सुद्धा हे निवेदन देण्यात आले