
राळेगाव येथील वॉर्ड क्र. 3 येथील महादेव मंदिर जागृत असल्याची भाविकांची भावना आहे. कार्तिक महिन्यात येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. काकड आरती समाप्ती वेळी बहुसंख्य महिलांनी उपस्थित राहून सांगता केली.
राळेगाव शहरातील भाविक भक्त या ठिकाणी नियमित येतात. महिलांचा साप्ताहिक भजन, पूजा मंदिर सुशोभीकरण यात सक्रिय सहभाग असतो. यात कलावती ठाकरे, संध्या बांगडे, दीपाली महाजन, ज्योती कारिया, गुंफाबाई राऊत, कविता पवार, सोनीताई वर्मा, मनीषा वर्मा,प्रमिला वर्मा, वनिता चिचाटे, प्रणिता चिचाटे, कविता अलोंने, मंदा चांदोरे, नंदा चांदोरे, टाले ताई, बढे आजी, कामिनी गहलोत, सोनू हांडे, अस्विनी पुरोहित, शुभांगी काळे, संगीता वर्मा, कल्पना चांदोरे, प्राची घोडे, भोयर ताई, मालू चांदोरे आदी सह विविध महिलांनी सहभाग नोंदवला.
